
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारत-पाकिस्तान तणावात आपण मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प करत आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या टी पार्टीची सध्या चर्चा होतेय. ट्रम्प यांनी एका अशा व्यक्तीला भेटले ज्याच्यावर एकेकाळी अमेरिकेनं ८३ कोटींचं बक्षीस ठेवलं होतं. या भेटीवेळी ट्रम्प यांच्यासोबत सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमानसुद्धा होते. धक्कादायक म्हणजे अमेरिकेविरुद्ध त्या नेत्यानं अनेक वर्षे युद्धही लढलं होतं.