
कराअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांना कतारने ३ हजार कोटींचं आलिशान असं विमान गिफ्ट दिलंय. तर युएईकडून 'एक थेंब तेल' देण्यात आलंय. सर्वात प्रीमियम असं हे कच्चं तेल आहे. ट्रम्प यांनी युएईकडून दिलेल्या एक थेंब कच्च्या तेलाच्या गिफ्टवर मजेशीर प्रतिक्रिया दिलीय. ट्रम्प म्हणाले की, मी यामुळे खूप आनंदी नाहीय. पण एकही थेंब न मिळण्यापेक्षा एक थेंब मिळाला हे चांगलंच आहे.