esakal | चीनने माहिती लपविली : ट्रम्प 
sakal

बोलून बातमी शोधा

Donald Trump

अमेरिकेत बाधितांची संख्या २६,५७४ झाली असून, मृतांची संख्याही ३५० च्या वर गेली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी ‘घरीच थांबा आणि जीव वाचवा’ असे आवाहन नागरिकांना केले आहे.

चीनने माहिती लपविली : ट्रम्प 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोनाच्या संसर्गाबाबत चीनने माहिती लपवून ठेवली, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. चीनने योग्य वेळी ही माहिती जगाला सांगितली असती, तर कोरोनाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करता आली असती, असा दावा ट्रम्प यांनी केला.

कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत गुप्तचरांनी आधीच माहिती दिल्याचा माध्यमांमधील दावा फेटाळून लावताना ट्रम्प म्हणाले की, संसर्गाचा उद्रेक होईपर्यंत आम्हाला याबाबत माहिती नव्हती. चीनमध्ये संसर्ग पसरला, त्याचा मोठा फटकाही बसला. मात्र, त्यांनी ही माहिती दडवून ठेवली. त्यांनी आधीच सांगितली असती, तर उपाययोजना राबविता आल्या असत्या. मी याबाबत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही बोललो. चीनला आम्ही मदतीसाठी हात पुढे केला, पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकेत बाधितांची संख्या २६,५७४ झाली असून, मृतांची संख्याही ३५० च्या वर गेली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी ‘घरीच थांबा आणि जीव वाचवा’ असे आवाहन नागरिकांना केले आहे. 

loading image
go to top