सभेसाठी एक कोटी नागरिक येणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

वृत्तसंस्था
Friday, 21 February 2020

पंतप्रधान मोदींच्या सभेत 50 हजार नागरिक उपस्थित

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येत आहे. असे असताना आता ट्रम्प यांनी अहमदाबाद दौऱ्यादरम्यान एक कोटी नागरिक उपस्थित राहतील, असा दावा केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद दौऱ्यावर येत असून, याच दौऱ्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी एक कोटी नागरिक उपस्थित राहतील, असा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनीच 50 लाख आणि नंतर 70 लाख नागरिक उपस्थित राहतील, असा दावा केला होता. आता ही संख्या वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेतील कोलराडो येथे आयोजित सभेत बोलताना ट्रम्प यांनी वक्तव्य केले. 

गुजरातमध्ये ट्रम्प यांच्या मार्गावरील कुत्रे, पानटपऱ्याही होणार गायब  

ते म्हणाले, भारतात माझ्या स्वागतासाठी 10 मिलियन लोक उपस्थित राहणार आहेत, असे मी ऐकलं आहे. स्टेडियमवर हे लोक जमणार असून, ही संख्या 60 लाख ते एक कोटीपर्यंत असू शकते.

पंतप्रधान मोदींच्या सभेत 50 हजार नागरिक उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत गेले होते, तेव्हा झालेल्या कार्यक्रमात सुमारे 50 हजार लोक उपस्थित होते. त्यानंतर आता अहमदाबाद येथील ट्रम्प यांच्या कार्यक्रमात एक कोटी नागरिक उपस्थित राहतील असे सांगितले जात आहे.

अहमदाबादची लोकसंख्या 63 लाख

अहमदाबादची लोकसंख्या 63 लाखांहून अधिक आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक कोटी नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या सभेत नेमके कितीजण उपस्थित राहतील, हे लवकरच समजणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump now expects 10M turnout in Ahmedabad