पाॅर्न स्टारला पैसे देण्याचे ट्रम्पना आदेश

यूएनआय
Monday, 24 August 2020

पाॅर्न स्टार स्टॉर्मी डॅनिएल्स हिला तिची वकील फी देण्यासाठी ४४,१०० डॉलर देण्याचे आदेश येथील न्यायालयाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले आहेत.

लॉस एंजेलिस - पाॅर्न स्टार स्टॉर्मी डॅनिएल्स हिला तिची वकील फी देण्यासाठी ४४,१०० डॉलर देण्याचे आदेश येथील न्यायालयाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२००६ मध्ये असलेल्या लैंगिक संबंधांबाबत गुप्तता पाळण्याबाबत ट्रम्प यांनी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणूकीपूर्वी डॅनिएल्सबरोबर करार करत तिला एक लाख तीस हजार डॉलर दिले होते, असा आरोप अमेरिकेतील एका वृत्तपत्राने २०१८ मध्ये केल्याने हे प्रकरण उजेडात आले होते. यानंतर डॅनिएल्स हिने ट्रम्प यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. हा खटला न्यायालयात हरल्याने ट्रम्प यांनी खटल्याचा खर्च डॅनिएल्स यांना द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump orders payment of porn star