...तर सोशल मीडिया कंपन्या बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

Donald Trump Plans Executive Order On Social Media After Twitter Places Fact Checks
Donald Trump Plans Executive Order On Social Media After Twitter Places Fact Checks

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया कंपन्यांना चांगली शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसं न झाल्यास या कंपन्या बंद करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ट्विट फॅक्टचेकअंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट अधोरेकित केल्यानंतर सोशल मीडिया कंपन्या आणि विशेष म्हणजे ट्विटरवर त्यांचा रोष ओढावला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांनी एकमागोमाग एक काही ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या ट्विटला फॅक्टचेक अंतर्गत अधोरेखित करत ते दिशाभूल करणारे असणं म्हणणं म्हणजे एक प्रकारे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणंच आहे, असं म्हणत ही कार्यपद्धती तातडीने बदलण्याची मागणी त्यांनी केली. 
------------
आरबीआय बॉँड्समध्ये गुंतवणूक करायची आहे? मग ही आहे शेवटची संधी...
------------
सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण
------------

Republicans feel that Social Media Platforms totally silence conservatives voices. We will strongly regulate, or close them down, before we can ever allow this to happen. We saw what they attempted to do, and failed, in 2016. We can’t let a more sophisticated version of that....

— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 27, 2020

ट्रम्प यांनी सोशल मीडिया कंपन्यांना हा इशारा दिला असला तरीही या कंपन्यांच्या भविष्याविषयीचा निर्णय घेणं हे त्यांच्या हाती नसल्याचं प्रत्यक्षात स्पष्ट होत आहे. मुळात या कंपन्या सार्वजनिक तत्त्वांवर चालत असून त्यांच्याकडून पुरवण्यात येणाऱ्या बहुतांश सुविधांचा कोट्यवधी नागरिक उपभोग घेत आहेत. संपूर्ण जगभरात या सोशल मीडिया कंपन्यांचं जाळं विविध मार्गांनी पसरलं आहे. मुख्य म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडिया कंपन्यांना धमकावणाऱ्या ट्रम्प यांनी कोणत्याही माध्यमाचा उल्लेख करणं टाळलं आहे.

काय आहे मूळ प्रकरण?
डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच ट्विटर या सोशल माध्यमाचा वापर करत आपल्या खात्यावरून ट्विट करत असतात. मात्र, ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेल्या काही ट्विटस वर फ्लॅग करत फॅक्ट चेकचा इशारा दिला आहे. ट्विटरच्या या संदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरचा हा संदेश बोलण्याच्या स्वातंत्र्याविरुद्ध असल्याचे म्हणत, शिवाय ट्विटरचे हे कृत्य म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 'मेल-इन-बॅलेट्सला बनावट' आणि 'मेल बॉक्स लुटला जाईल' असा संदेश आपल्या ट्वीट मध्ये लिहीत अधीकृत खात्यावरून शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या या ट्वीट्स वर लिंक येत असून, मेल-इन-बॅलेट्सविषयी तथ्य जाणून घ्या असा लिहिलेला मजकूर येत आहे. या लिंक वरून ट्विटरच्या फॅक्ट चेक्स पेज वर जाता येते. या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबधीत त्यांनी केलेल्या खोट्या दाव्यांबाबत माहिती दिसते. यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या या संदेशानंतर ट्विटरवर टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com