esakal | अगायाया! ट्रम्प यांची बिल्डिंग 7 सेकंदात जमीनदोस्त, VIDEO बघा

बोलून बातमी शोधा

donald trump plaza}

इमारत पाडताना बघण्यासाठी खास व्यवस्था केली गेली होती. 

अगायाया! ट्रम्प यांची बिल्डिंग 7 सेकंदात जमीनदोस्त, VIDEO बघा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अटलांटीक सिटी : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जुन्या प्रॉपर्टीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांची एक जुनी बिल्डींग नेस्तनाबूत करण्यात आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अटलांटीक सिटीमधील ट्रम्प प्लाझा हॉटेल एँड कसिनोला पाडण्यात आलं आहे. 

ट्रम्प प्लाझाची सुरवात 1984 मध्ये झाली होती आणि हा प्लाझा रियल स्टेट पोर्टफोलियोमधील एक मोठा भाग होता. या प्लाझामधील कसिनो 2014 मध्ये बंद करण्यात आला होता. त्यानंतर ही बिल्डींग खूपच खराब अवस्थेत होती. त्यामुळे तिला पाडण्यात आले आहे. 3000 डायनामाइटच्या मदतीने 34 मजली इमारत पाडताना बघण्यासाठी खास व्यवस्था केली गेली होती. 

हेही वाचा - 'ही काय प्रश्न विचारण्याची नवी फॅशन?' दिशा रवीच्या अटकेवरुन अमित शहा यांची आली प्रतिक्रिया

तसेच मोठ्या आवाजासह ही बिल्डींग पडताना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. इतकंच नव्हे तर आसपासच्या हॉटेल्सनी बेस्ट व्ह्यूने हे दृश्य पाहता यावे म्हणून बुकींगही केलं होतं. काही सेकंदातच ही बिल्डींग पडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.