esakal | 'ही काय प्रश्न विचारण्याची नवी फॅशन?' दिशा रवीच्या अटकेवरुन अमित शहा यांची आली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah on disha ravi

जर एखादी व्यक्ती गुन्हा करत असेल तर त्याचं वय विचारायला हवं का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे. 

'ही काय प्रश्न विचारण्याची नवी फॅशन?' दिशा रवीच्या अटकेवरुन अमित शहा यांची आली प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता : ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात 21 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिच्या अटकेवरुन देशभरात चर्चा झाली. केंद्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप मोदी सरकारवर करण्यात आला. यासंदर्भातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. त्यांना प्रश्न विचारले गेल्यावर पहिल्यांदाच त्यांनी यासंदर्भात वक्तव्य करताना दिल्ली पोलिसांचं समर्थन केलं आहे.  त्यांनी म्हटलंय की, यामध्ये काय चूक आहे? जर एखादी व्यक्ती गुन्हा करत असेल तर त्याचं वय विचारायला हवं का? त्याचं प्रोफेशन विचारायला हवं का? की त्याने गुन्हा केलाय की नाही याच्या पायावर तपास व्हायला हवा? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे. 

हेही वाचा - WhatsApp ने पुन्हा लावल्या अटी; युजरने अपडेट स्वीकारावेत यासाठी नवीन शक्कल
याप्रकारचे प्रश्न विचारण्याची फॅशन सुरुय
एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की, जर उद्या कुणीही मोठा गुन्हा केला आणि आरोप दाखल केला तर असं म्हणायला हवं का की राजकीय नेत्यांवर का दाखल केलाय? प्रोफेसर लोकांवर का केलाय अथवा शेतकऱ्यांवर का दाखल केलाय? त्यांनी म्हटलं की असं विचारुन चालणारे का? पुढे शहा यांनी म्हटलं की, हा काय नवा मार्ग काढलाय? जेंडर, प्रोफेशन आणि वयाच्या आधारावर FIR दाखल होईल की नाही, हे ठरणारे का? याप्रकारचे प्रश्न विचारण्याची एक नवी फॅशन आहे. या देशात न्यायालये आहेत की नाही? जर चुकीची FIR असेल तर आपण ती रद्दबातल करण्यासाठी न्यायालयात जाऊ शकता. 

हेही वाचा - गलवान खोऱ्यात 5 जवान मारले गेल्याची पहिल्यांदाच चीनची कबुली; नावे केली जाहीर

पुढे त्यांनी म्हटलं की, शेतकरी आंदोलनाशी निगडीत तपासाबाबत ते काहीही बोलणार नाहीत. IPS अधिकारी योग्यपद्धतीने तपास करत असून त्यावर आमचा विश्वास आहे. कायदा मोडून काही करण्यासाठी खास निर्देश वगैरे दिले गेले नाहीयेत. लोक घटनेप्रमाणे काम करत आहेत.