
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलीन लेविट यांचं कौतुक करताना केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. यावरून आता वादविवाद सुरू झाला आहे. न्यूजमॅक्सला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी लेविट यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. आतापर्यंतचा सर्वात चांगली अशी प्रेस सचिव असल्याचं ट्रम्प म्हणालेत. मात्र कौतुक करताना ट्रम्प यांनी वापरलेल्या शब्दांनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.