...म्हणून भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

कार्तिक पुजारी
मंगळवार, 14 जुलै 2020

अमेरिकेत कोरोना महामारीने थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात
कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असण्याचं कारण सांगितलं आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेत कोरोना महामारीने थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात
कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असण्याचं कारण सांगितलं आहे. देशात मोठ्या प्रमाणात कोविड-19 चाचणी घेण्यात येत आहे. चाचण्यांचे प्रमाण रशिया, भारत, चीन आणि

चीनकडे जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य, पण अमेरिकेला आहे एक मोठा फायदा
ब्राझिल या देशांपेक्षा कितीतरी अधिक आहेत. त्यामुळेच अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. जगात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या
दरापेक्षा अमेरिकेतील रुग्णांचा मृत्यू दर सर्वात कमी आहे, असं ते म्हणाले आहेत. भारतासारख्या देशाने आपल्या इतक्या चाचण्या घेतल्या असत्या तर तिथे आकडे वेगळे दिसले असते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसच्या गोलमेज बैठकीत बोलत होते. आपण अशा देशांमध्ये मोडतो, जेथे सर्वात कमी मृत्यू दर आहे, असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत आतापर्यंत 34 लाखपेक्षा अधिक कोरोनाबाधिक रुग्ण आढळले आहेत आणि कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 37 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अन्य देशांच्या तुलनेत हे दोन्ही आकडे खूप जास्त आहेत.

अमेरिकी सरकारकडून मोठ्या प्रमाणात चाचणी अभियान सुरु आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात बाधित लोक आढळत आहेत. देशाने चालवलेले अभियाने इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक व्यापक आहे. आपण आतापर्यंत सर्वाधिक चाचण्या घेतल्या आहेत. जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात चाचण्या घेता, तेव्हा मोठ्या प्रमाणात नवे प्रकरणे समोर येतात. त्यामुळे आपल्या देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की काही देश तेव्हाच चाचण्या घेतात, जेव्हा कोणी रुग्णालयात जातं. काही देश अशा प्रकारची चाचणी घेत आहेत, त्यामुळे तेथे जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत नाहीत, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.

CBSE बोर्ड दहावी परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वाची बातमी; निकाल जाहीर होणार...
अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा दर सर्वात कमी आहे किंवा सर्वात कमी दराच्या आजपास आहे. आम्ही चांगलं काम करत आहोत. आम्ही लस तयार करणे आणि उपचाराच्या कामात सर्वोतपरी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपल्याला लवकरच एक चांगली बातमी मिळणार असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत.

आपण योग्य दिशेने काम करत आहोत. जगात आपल्यासारखं कोणीच काम करत नाहीय. तुम्ही चीन किंवा रशिया या मोठ्या देशांचं उदाहरण घ्या, जर भारतासारख्या देशात आपण घेतल्या त्याप्रमाणे चाचण्या घेतल्या असत्या तर तेथे तुम्हाला आश्चर्यकारक आकडे पाहायला मिळाले असते. ब्राझिल मोठ्या अडचणींमधून जात आहे, पण त्यांनीही आपल्या इतक्या चाचण्या घेतल्या नसल्याचं ट्रम्प म्हणाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump said about cororna virus situation in india