esakal | अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

donald_trump

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी योग्यतेवर आधारित स्थलांतरित प्रक्रिया( merit based us Immigration system) आणण्याची तयारी सुरु केली आहे. व्हाईट हाउसकडून याबाबतची माहिती देण्यात आली आ

अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घोषणा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी योग्यतेवर आधारित स्थलांतरित प्रक्रिया( merit based us Immigration system) आणण्याची तयारी सुरु केली आहे. व्हाईट हाउसकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना योग्यतेवर आधारित स्थलांतरित प्रक्रिया आणण्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर व्हाईट हाऊसकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर निर्बंध आणले होते. त्यामुळे या नव्या घोषणेला महत्व आहे.

अमेरिकेत 24 तासांत 70 हजारहून अधिक रुग्ण; अखेर ट्रम्प मास्क वापरण्यास '...
डेफर्ड अॅक्शन फॉर चाईल्डहुड अराईवल्स (DACA) या कार्यक्रमाअंतर्गतही नागरिकता देण्यात येईल, असं ट्रम्प म्हणाले आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्थलांतरितांसाठी एक मोठे विधेयक घेऊन येणार असल्याचं म्हटलं होतं. ट्रम्प म्हणाले होते की, एक मोठे आणि खूप चांगले विधेयक आणले जाणार आहे. हे विधेयक योग्यतेच्या आधारावर असेल आणि यात DACA चाही समावेश करण्यात येईल. लोकांना या विधेयकाबद्दल ऐकून आनंद वाटेल. तसेच यामुळे नागरिकतेचा एक मार्क मोकळा होईल

डेफर्ड अॅक्शन फॉर चाईल्डहुड अराईवल्स (DACA)ही एक प्रशासकीय सूट आहे. याअंतर्गत लहानपणी अमेरिकेत आलेल्या प्रवाशांची प्रत्यार्पणापासून सुरक्षा होते. वाईट हाउसने हे नवीन बिल स्थानिक अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी असल्याचं म्हटलं आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या सूतोवाचाने अमेरिकेत राजकीय वाद-विवाद सुरु झाले आहेत. सिनेटर टेड क्रूज यांनी ट्रम्प यांचे पाऊल अत्यंत चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेकडून मुंबईतील धारावी मॉडेलचं कौतुक
अध्यक्ष ट्रम्प DACA वर कायदेशीर वाटाघाटीसाठी काँग्रेससोबत काम करण्यासाठी तयार आहेत. यात नागरिकता, मजबूत सीमा सुरक्षा आणि कायमचे गुणवत्ता आधारित  सुधारित बिल या विषयांचाही समावेश असेल, असं व्हाईट हाउस प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. सीमा सुरक्षेबाबत आम्ही डेमोक्रॅटसोबत वाटाघाडी करण्याचा प्रयत्न केला. पण सर्व सीमा सर्वांसाठी खुल्या केल्या जाव्या याशिवाय ते काहीही बोलायला तयार नाहीत, असंही प्रवक्त्याने सांगितलं.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून स्थलांतरितांविरोधात भूमिका घेण्यात आली आहे. त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत H-1B व्हिसावर बंदी आणली आहे. त्यामुळे अनेकांच्या अमेरिकेत जाण्याच्या स्वप्नांना मुरड बसली आहे.