अमेरिकेची सुबत्ता ‘न भुतो न भविष्यती’! - ट्रम्प

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जानेवारी 2020

‘सध्या अमेरिकेत जी आर्थिक भरभराट होते आहे आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आहे अशी जगाने आतापर्यंत अन्यत्र कुठेही बघितली नव्हती,’’ असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. अमेरिकेची सुबत्ता न भूतो न भविष्यती अशी आहे आणि आजच्या अमेरिकी मध्यम वर्गापेक्षा अधिक आर्थिक सुबत्तेत इतर कोणीही नाही, असेही ते पुढे म्हणाले.

दावोस - ‘सध्या अमेरिकेत जी आर्थिक भरभराट होते आहे आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आहे अशी जगाने आतापर्यंत अन्यत्र कुठेही बघितली नव्हती,’’ असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. अमेरिकेची सुबत्ता न भूतो न भविष्यती अशी आहे आणि आजच्या अमेरिकी मध्यम वर्गापेक्षा अधिक आर्थिक सुबत्तेत इतर कोणीही नाही, असेही ते पुढे म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक आर्थिक परिषदेच्या (डब्ल्यूईएफ) वार्षिक परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना ट्रम्प यांनी हे मत व्यक्त केले. दोन वर्षांआधी आपण दावोसमध्ये भाषण केल्यानंतर अमेरिकेने जबरदस्त पुनरागमन केले आहे. आज मला हे सांगायला अभिमान वाटतो की, अमेरिका यापूर्वी कधीही न अनुभवलेली समृद्धी अनुभवत आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतावासाजवळ रॉकेट हल्ला

आपल्या निवडीनंतर अमेरिकेत एक कोटी १० लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असून, देशातील सरासरी बेरोजगारी दर इतर कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकालापेक्षा कमी आहे. सध्या चीनबरोबर सुरू झालेला व्यापारविषयक करार अत्यंत महत्त्वाचा आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump says