बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतावासाजवळ रॉकेट हल्ला

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जानेवारी 2020

अमेरिकेने या हल्ल्याप्रकरणी इराणवर आरोप केला आहे. यापूर्वीही बगदादमध्ये ग्रीन झोनमध्ये असे हल्ले झाले होते. अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

बगदाद : इराकची राजधानी बगदाद शहरातील ग्रीन झोनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दुतावासाजवळ तीन रॉकेट डागण्यात आल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद शांत होण्याचा मार्गावर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका दुतावासाजवळ झालेल्या या रॉकेट हल्ल्यामध्ये जिवीतहानी झालेली नाही. हल्ल्यानंतर या पूर्ण परिसरात सायरन वाजवून अलर्ट करण्यात आले. नागरिकांनी सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

‘महाविकास’ची समन्वय समिती

अमेरिकेने या हल्ल्याप्रकरणी इराणवर आरोप केला आहे. यापूर्वीही बगदादमध्ये ग्रीन झोनमध्ये असे हल्ले झाले होते. अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पाहता हा हल्ला इराणकडूनच करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा कमांडर कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three Rockets Hit Baghdads Green Zone Near US Embassy

टॅग्स
टॉपिकस