Former U.S. President Donald Trump claims tariffs pushed India and Russia closer to China, reshaping global trade dynamics.

esakal

Donald Trump : ट्रम्प यांना उपरती! अतिरिक्त 'टॅरिफ' लादल्यानंतर आता भारताबद्दल केलंय मोठं विधान, म्हणाले...

Donald Trump on India and Russia : ट्रम्प यांनी आपल्या विधानात रशिया आणि चीनचाही उल्लेख केला आहे; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत?
Published on

Donald Trump on Losing India and Russia: भारतावर अन्याकारक पद्धतीने अतिरिक्त कर लादल्यानंतर आणि दोन्ही देशांमधील संबंधात तणाव निर्माण केल्यानंतर, आता कुठं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती झाल्याचे दिसत आहे.

कारण, ट्रम्प यांना आता भारताबाबत एक मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलय की, असं वाटतय की आम्ही भारताला गमावलं आहे. ट्रम्प यांचे डोळे अशावेळी उघडले आहेत, जेव्हा भारत, रशिया आणि चीन हे बलाढ्य राष्ट्र एकमेकांच्या जवळ आले आहेत आणि एकमेकांसोबत उभा राहिले आहेत.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलय की, ''असं वाटतंय की आम्ही भारत आणि रशिया यांना सर्वात भीषण, अंधारलेल्या चीनच्या हाती गमावले आहे. देव त्यांना दीर्घ आणि समृद्ध भविष्य देवो.''

Former U.S. President Donald Trump claims tariffs pushed India and Russia closer to China, reshaping global trade dynamics.
PM Modi Reaction on GST Reform : ‘’मी लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो, की..’’ ; GST 'रिफॉर्म'वर मोदींची पहिली प्रतिक्रिया!

यापूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात टॅरिफच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण सादर केले होते. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या २५१ पानांच्या तयार उत्तरात भारतावर इतका जास्त टॅरिफ का लादण्यात आला हे स्पष्ट केले.

Former U.S. President Donald Trump claims tariffs pushed India and Russia closer to China, reshaping global trade dynamics.
Sonia Gandhi case: सोनिया गांधींच्या अडचणी वाढणार? दिल्लीच्या कोर्टात आता नवीन तक्रार दाखल!

 ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की युक्रेन-रशिया युद्ध आणि त्यामुळे उद्भवलेल्या राष्ट्रीय आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. ट्रम्प यांच्या विधानावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, सध्या या विषयावर त्यांचे काहीही म्हणणे नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com