Prime Minister Narendra Modi recalls Red Fort assurances while giving his first reaction on GST reform.
esakal
PM Modi’s First Reaction on GST Reform: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या जीएसटी कॉन्सिलच्या ५६ व्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. याद्वारे सणासुदीच्या काळात मोदी सरकारने देशभरातील सर्वसामान्य जनतेला आनंदाची बातमी दिली आहे.
या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच जीएसटी स्लॅब असतील. तर उर्वरीत दोन १२ टक्के आणि २८ टक्के हे जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. परिणामी त्यामध्ये समाविष्ट असलेल्या बहुतेक गोष्टी फक्त दोन मंजूर टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर विविध प्रतिक्रियाही उमटत असताना, आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही या निर्णयावरील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

जीएसटी सुधारणांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘’स्वातंत्र्यानंतरचा हा देशाचा सर्वात मोठा निर्णय आहे. वेळेवर बदल न करता आपण आजच्या जागतिक परिस्थितीत आपल्या देशाला त्याचे योग्य स्थान देऊ शकत नाही. यावेळी १५ ऑगस्ट रोजी मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते की, भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी पुढील पिढीतील सुधारणा आवश्यक आहेत. मी देशवासियांना वचन दिले होते की या दिवाळी आणि छठपूजेपूर्वी आनंदाचा डबल धमका होईल.’’
याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता जीएसटी आणखी सोपा झाला आहे. जीएसटीचे मुख्यतः दोन दर शिल्लक आहेत, ५ टक्के आणि १८ टक्के. तर जीएसटीचे नवीन दर २२ सप्टेंबर सोमवारपासून लागू होतील... म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून. तसेच मोदी म्हणाले की, २१ व्या शतकात पुढे जाणाऱ्या भारतात, जीएसटीमध्येही पुढील पिढीतील सुधारणा करण्यात आल्या आहेत. जीएसटी-२ हा देशासाठी आधार आणि विकासाचा दुहेरी डोस आहे.
याशिवाय पंतप्रधान मोदी म्हणाले की, जीएसटीमधील सुधारणांमुळे भारताच्या भव्य अर्थव्यवस्थेत पंचरत्नाची भर पडली आहे. पहिले म्हणजे, करप्रणाली खूपच सोपी झाली आहे. दुसरे म्हणजे, भारतातील नागरिकांच्या जीवनमानात आणखी वाढ होईल. तिसरे म्हणजे, उपभोग आणि विकास या दोन्हींना एक नवीन बूस्टर मिळेल. चौथे म्हणजे, व्यवसाय करण्याच्या सुलभतेमुळे गुंतवणूक आणि रोजगार वाढेल. पाचवे म्हणजे, विकसित भारतासाठी सहकारी संघराज्य अधिक मजबूत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.