
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल मीडियावर खळबळजनक असा दावा केला आहे. ट्रम्प यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबाबत कॉन्स्पिरसी थेअरही मांडली होती. यात दावा केला होता की, ज्यो बायडेन यांना २०२० मध्ये मारलं होतं. त्यांच्या जागी रोबोटिक क्लोन आहे.