esakal | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकललेल्या बऱ्या- डोनाल्ड ट्रम्प
sakal

बोलून बातमी शोधा

trump2_24.jpg

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे सुचवले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकललेल्या बऱ्या- डोनाल्ड ट्रम्प

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे सुचवले आहे. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीच्या पोलमध्ये मागे पडताना दिसत आहेत. शिवाय देशातील कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाचा संदर्भ देत ट्रम्प यांनी निवडणुका पुढे ढकलणे योग्य असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी यासंदर्भातील ट्विट केलं आहे.

चीन लडाखमध्ये मोठ्या संघर्षाची करतोय तयारी; सॅटेलाईट फोटोंमधून उघड
यूनिवर्सल मेल-इन मतदान प्रक्रियेने या वर्षीच्या निवडणुका घेऊ नये. असे केल्यास इतिहासातील या सर्वात अयोग्य निवडणुका असतील. जोपर्यंत लोक योग्यपणे आणि सुरक्षितपणे मत देऊ शकत नाहीत, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात?, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. 

3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका नियोजित आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी निवडणूक प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणुकासाठी 100 दिवसांपेक्षा कमी वेळ राहिला असल्याने दोन्ही नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. अशात डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचे सुचवल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

निवडणुकासाठी घेण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रप यांची पीछाडी होताना दिसत आहे, तर जो बायडेन यांच्या बाजून अमेरिकी नागरिकांचं मत दिसून येत आहे. शिवाय कोरोना महामारीमुळे अमेरिकेत असामान्य आणि अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ट्रम्प अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मार्ग खडतर दिसत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचे सूचवले असल्याचं अनेकांचं मत आहे.

भारतातच नाही तर अमेरिकेतही 'जय श्रीराम'; टाईम स्क्वेअरवर झळकणार..
दरम्यान, अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे यावेळी निवडणुका पुढे ढकलल्या जातील का, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी अमेरिकेच्या दोन्ही सभागृगाची मंजूरी आणि अर्ध्या राज्यांनी याला संमती देणे आवश्यक आहे. 

(edited by-kartik pujari)