
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून २० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड जॉन ट्रम्प (वय ७८) यांची दुसऱ्यांदा निवड झाली. ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी झाला होता त्यांची जडणघडण ही देखील न्यूयॉर्कमध्येच झाली, दोन भाऊ आणि एक बहीण अशा भावंडांच्या गराड्यातच ते लहानाचे मोठे झाले. ट्रम्प यांचे वडील हे रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे व्यक्ती म्हणून ओळखले जात असत. येथील क्वीन मॅन्शनमध्येच त्यांनी आपल्या मुलांना ठेवले होते. जॉन ट्रम्प यांचे निधन झाले तेव्हा ते त्यांच्या मुलांसाठी वारसा म्हणून भरपूर संपत्ती सोडून गेले .
आता डोनाल्ड ट्रम्प यांचेही पाच मुले अन् तीन बायका असे मोठे कुटुंब आहे. इव्हाना (१९९० पर्यंत), मार्ला (१९९९ पर्यंत) आणि मेलेनिया (२००५ पासून) अशी त्यांच्या पत्नीची नावे होत. डोनाल्ड ट्रम्प यांनी फिलाडेल्फियाच्या पेनसिल्व्हानिया विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचे धडे गिरविले. त्यांनी १९६८ मध्ये याच विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी देखील मिळविली. ते आता ज्यो बायडेन यांची जागा घेतील.
ट्रम्प आणि बायडेन यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. दोघांची राजकीय आणि आर्थिक धोरणे देखील वेगळी आहेत. मागील काही महिन्यांतील ट्रम्प यांची राजकीय वक्तव्ये आपण लक्षात घेतली तर एक बाब स्पष्टपणे दिसून येते, ती म्हणजे धोरणात्मक आघाडीवर एक पूर्णपणे वेगळी राजकीय मांडणी त्यांच्यामुळे पाहायला मिळेल. ट्रम्प यांचे काही धोरणात्मक निर्णय भारतावर नेमके कसे परिणाम करू शकतात या घेतलेला हा धावता आढावा.