
रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. अनेक बड्या नेते आणि उद्योगपतींच्या उपस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. युनायटेड स्टेट्सचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ दिली.