अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलीय. ट्रम्प यांच्या या निर्णय़ामुळे जगात व्यापार युद्धाची भीती निर्माण झालीय. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर पैसे जमा होणार आहे. तिजोरी भरणार असली तरी ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे अमेरिकन नागरिकांच्या नाराजीतही वाढ झालीय. आता ट्रम्प यांनी आणखी एक मोठं विधान केलंय.