अखेर गडी नमला! ट्रम्प यांनी सत्तांतरणासाठी दिली परवानगी; 'मी पुन्हा येईन'चा एल्गार कायम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

निकाल अमान्य करणारे डोनाल्ड ट्रम्प कशी भुमिका घेतील याबाबत संदिग्धता होती.

वॉशिंग्टन : गेल्या तीन नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला होता. आपला पराभव होतोय याची चिन्हे दिसू लागल्याबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुक प्रक्रियेवर ठपका ठेवत कांगावा सुरु केला होता. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतर करण्याची प्रक्रिया सुरु करण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र ही लढाई सुरु ठेवणार असून ती मी जिंकणार असल्याचा आपला दावा त्यांनी कायम ठेवली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यांतील निकालाविरोधात त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी त्यानंतरही आपला पराभव मान्य न करता मीच विजयी झालो आहे, असा छातीठोक दावा केला होता. ते पदावरुन पायउतार होतील की नाही याविषयी बऱ्याच शंका व्यक्त केल्या जात होत्या. निकाल अमान्य करणारे डोनाल्ड ट्रम्प कशी भुमिका घेतील याबाबत संदिग्धता होती. येत्या 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या नव्या निर्वाचित राष्ट्राध्यक्षाला शपथ दिली जाते. 

हेही वाचा - जो बायडन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा दलात तीन महिलांचा समावेश

अमेरिकेतील निवडणुकांनंतर तीन ते चार आठवडे उलटल्यानंतरही ट्रम्प निकाल मान्य करायला तयार नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेकदा जो बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटीक पक्षावर निशाणा साधला होता. निवडणुकीचा निकाल अगदी स्पष्ट असूनही मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, तिथेही त्यांचा भ्रमनिरास झाला. आणि आता सरतेशेवटी डोनाल्ड ट्रम्प नमते घेताना दिसत आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी General Service of Administration अर्थात सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटलंय की जे काही करण्याची गरज आहे ते करा. त्यांच्या या परवानगीनंतर जीएसए एमिली मर्फी यांनी जो बायडन यांना पत्र लिहून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. 

हेही वाचा - मंगळावर आला होता महापूर; कधी ते वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, मी जीएसए एमिली मर्फीचे तिच्या देशावरील दृढनिष्ठा आणि निष्ठेबद्दल आभारी आहे. तिचा छळ केला गेला, धमकावले गेले आणि अत्याचार केले गेले आहेत. आणि मला हे तिच्या, तिच्या कुटूंबात किंवा जीएसएच्या कर्मचार्‍यांसह घडताना पाहायचे नाही. माझा लढा सुरुच आहे. आणि तसेच आपणच विजयी होऊ, असा विश्वासही व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald Trump tells officials to begin transition for next administration