मंगळावर आला होता महापूर; कधी ते वाचा

मंगळ भूमीवर क्युरिऑसिटी बग्गी
मंगळ भूमीवर क्युरिऑसिटी बग्गी

न्यूयॉर्क - मंगळाच्या विषुववृत्तावर असलेल्या गेल दरीमध्ये चार अब्ज वर्षांपूर्वी अतिप्रचंड महापूर आला होता, अशी शक्यता एका अभ्यासानंतर व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालामुळे मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यतेला पुन्हा जोर आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबतचा अहवाल ‘सायंटिफिक रिपोर्ट्‌स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ‘नासा’ने २०११ मध्ये मंगळाच्या दिशेने सोडलेल्या क्युरिओसिटी या बग्गीने केलेल्या निरीक्षणावरून आणि गोळा केलेल्या माहितीवरून हा अंदाज बांधण्यात आला आहे. चार अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर असलेल्या बर्फावर उल्का पडल्याने बर्फ वितळून प्रचंड मोठा पूर आल्याचे पुरावे मिळत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या संशोधनात अमेरिकेतील कॉर्नवेल विद्यापीठातील संशोधकांनी सहभाग घेतला होता. 

‘क्युरिओसिटी’ने गोळा केलेल्या माहितीनुसार, मंगळावरील दरीत दिसत असलेला पृष्ठभाग हा पृथ्वीवर मोठा पूर येऊन गेल्यावर दिसणाऱ्या पृष्ठभागाप्रमाणेच आहे. पुराचे हे पुरावे मंगळावरील विशिष्ट वातावरणामुळे चार अब्ज वर्षे तसेच राहिले. 

अचानक बर्फ वितळल्याने पूर येण्याबरोबरच वातावरणात कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन वायू मुक्त झाला. या वायूंचा वाफेबरोबर संयोग होऊन अल्प कालावधीसाठी मंगळावर उष्ण वातावरण तयार झाले. यामुळे कदाचित पाऊसही पडला असेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

चीनची तयारी अंतिम टप्प्यात
वेनचँग - चांद्रमोहिमेसाठी चिनी खगोलशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या (ता. २४) चीनचे अवकाशयान चंद्राकडे झेपावण्याची शक्यता आहे. या मोहिमेद्वारे चंद्रावरील खडे आणि इतर कचरा परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून चार दशकांमधील असा हा पहिलाच प्रयत्न असेल. या मोहिमेमुळे चंद्रावरील वातावरणाची आणि पृष्ठभागाची अधिक माहिती मिळण्यास मदत होईल, असा चिनी शास्त्रज्ञांना विश्‍वास आहे. प्रक्षेपणाची निश्‍चित तारीख चीनने जाहीर केली नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com