esakal | अमेरिकेत परदेशांतून येणाऱ्यांवर बंदी; ट्रम्प यांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Donald Trump to temporarily suspend immigration into US

अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी ही घोषणा केली आहे.

अमेरिकेत परदेशांतून येणाऱ्यांवर बंदी; ट्रम्प यांची घोषणा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असाताना अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी ही घोषणा केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला अमेरिकेत स्थायिक होण्यास परवानगी दिली जाणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. ट्रम्प म्हणाले, 'अदृश्य शत्रूंच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आम्हाला आपल्या महान अमेरिकन नागरिकांच्या नोकर्‍या वाचवाव्या लागतील. हे लक्षात घेता, मी एका आदेशावर स्वाक्षरी करीत आहे, ज्यामुळे बाहेरील लोकांना अमेरिकेत स्थायिक होण्यास बंदी घालण्यात येईल.'

लॅटिन अमेरिका, युरोपमधील मोठ्या संख्येने लोक अमेरिकेत जातात. याखेरीज त्यांची संख्या भारतासह इतर आशियाई देशांतून वाढली आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कोणत्याही प्रकारच्या स्थलांतरणावर बंदी घातली आहे, ही बंदी तात्पुरती लागू केली गेली आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या भयंकर स्वरूपामुळे अमेरिकेला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. गेल्या दोन महिन्यांत अमेरिकेत १० दशलक्षाहूनही अधिक लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत आणि बेरोजगारांना उपलब्ध असलेल्या सुविधांसाठी अर्ज केले आहेत. याशिवाय अमेरिकन व्यवसायावर मोठे संकट निर्माण झाले आहे, म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे.

loading image
go to top