
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला होता. यात त्यांनी टॅरिफचा निर्णय़ घेतल्यानंतर आणि ईव्हीबाबतच्या धोरणावरून इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या सरकारमधील पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना वेगळा पक्ष काढण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, ट्रम्प आणि मस्क यांच्यातला वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. ट्रम्प यांनी थेट मस्क यांना तुम्हाला अमेरिकेतला गाशा गुंडाळन तुमच्या मूळ देशात दक्षिण आफ्रिकेत जावं लागेल अशा शब्दात बजावलं आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणावरून बिनसल्याचं म्हटलं जातं आहे.