

Midterm Polls Show A Blue Wave In US
esakal
Donald Trump America Politics: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुका राजकीय कसोटीच्या ठरण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्ष बहुमत मिळवण्याच्या दिशेने आघाडीवर असल्याचे निवडणूकपूर्व सर्वेक्षणांतून दिसून येत आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या काही राज्यांमध्येही चुरस वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात ‘ब्लू वेव्ह’ म्हणजे डेमोक्रॅट्सच्या बाजूने मोठी लाट येणार का, याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा