
न्यूयॉर्क/रिओ दी जानेरो : ‘ब्रिक्स’ गटाच्या अमेरिकाविरोधी धोरणांचे अनुसरण करणाऱ्या देशांवर १० टक्के अतिरिक्त आयातशुल्क लागू करण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. यातून कोणालाही सूट दिली जाणार नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून भात्यात ठेवलेले ‘आयातशुल्का’चे अस्त्र ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बाहेर काढल्याचे स्पष्ट झाले आहे.