आंदोलन चिघळले; ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमधल्या संरक्षण बंकरमध्ये हलविले

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जून 2020

व्हाईट हाऊससमोरील परिस्थिती एवढी चिघळली, की तेथे तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजन्ट्स अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये असलेल्या संरक्षण बंकरमध्ये घेऊन गेले.

भारत

वॉशिंग्टन : जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर कृष्णवर्णीय समुदायाची निदर्शने अधिक तीव्र होताना दिसत आहेत. यामुळे अमेरिकेतील तब्बल 30 शहरे हिंसेच्या आगीत होरपळत आहेत, याची झळ रविवारी व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचली. व्हाईट हाऊससमोरील परिस्थिती एवढी चिघळली, की तेथे तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजन्ट्स अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये असलेल्या संरक्षण बंकरमध्ये घेऊन गेले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राजधानी वाशिंग्टनमध्ये तर परिस्थिती एवढी चिघळली आहे, की महापौरांनी रात्री 11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यूची घोषणा केली आहे. तसेच, व्हाइट हाऊसजवळ सलग तिसऱ्या दिवशीही निदर्शन सुरूच होते. व्हाइट हाऊस परिसराद तणाव -व्हाइट हाऊसजवळ निदर्शन करत असलेल्या जमावाने तेथील कचऱ्याला आग लावली आणि पोलिसांनाही धक्काबुक्की केली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी व्हाइट हाऊसजवळील निदर्शकांना पांगवण्यात यश मिळवले.
------
कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी; कोणाला टाकले मागे?
------
कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील अनेक शहरांत  शुक्रवारपासून हिंसक निदर्शने होत आहेत. यापैकी काही निदर्शनांनी आक्रमक रूप धारण केले आहे. ट्रम्प यांनी डाव्यांना धरले जबाबदार -अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध शहरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांसाठी डाव्यांना जबाबदार धरले आहे. यामुळे निर्दोष लोक भयभीत झाले आहेत. निदर्शक उद्योग धंद्यांचेही नुकसान करत आहेत. इमारती जाळत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

काय आहे मूळ प्रकरण?
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाने २० डॉलरची एक बनावट नोट एका दुकानात चालविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. जॉर्जला त्याच्या कारमधून उतरायला सांगितल्यानंतर त्याने पोलिसांशी हुज्जत घातली व झटापटही केली होती असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर, जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्याने देशभर जनक्षोभाची मोठी लाट निर्माण झाली.

अमेरिकेतील विविध राज्यांत लोकांनी उत्स्फुर्तपणे रस्त्यांवर उतरून आंदोलन केले. मिनियापोलिस शहरामध्येही आंदोलकांनी आज संचारबंदी धुडकावून लावत सरकार आणि यंत्रणेविरोधात निदर्शने केली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी पोलीस तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्य शहरांमध्ये देखील हे आंदोलनाचे लोण पसरल्याने यंत्रणा सावध झाली आहे. दरम्यान, फ्लॉइड यांची मान दोन्ही गुडघ्यांच्या खाली दाबून धरणाऱ्या श्वेतवर्णीय डेरेक शोविन या पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump Was Briefly Taken To Underground Bunker During White House Protests