
Donald Trump Stormy Daniels: ट्रम्प-पॉर्न स्टार प्रकरण नेमकं आहे तरी काय? स्टॉर्मीने ट्विट करून म्हटलं...
Donald Trump News - २०१६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आरोपांपासून वाचण्यासाठी स्टॉर्मी डॅनियल्स या स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याचा ठपका ठेवत मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला चालवण्यास गुरुवारी मंजुरी दिली.
आता पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सने या प्रकरणात तिला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल लोकांचे आभार मानले आहेत.
स्टॉर्मी डॅनियल्सने ट्विट केले की, "मला इतके मेसेज येत आहेत की मी उत्तर देऊ शकत नाही. तसेच मला आपली शॅम्पेन उडवायची नाहीये. (मजा खराब करायची नाही.) #TeamStormieMerch / ऑटोग्राफ ऑर्डर देखील येत आहेत! त्याबद्दलही धन्यवाद, पण शिपमेंटसाठी आणखी काही दिवसांचा अवधी द्या."
डॅनियल्सने २०१८ च्या 'फुल डिस्क्लोजर' या पुस्तकात ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीचा खुलासा केला होता. पुस्तकानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट जुलै २००६ मध्ये एका गोल्फ स्पर्धेदरम्यान स्टार स्टॉर्मी डॅनियल्सशी झाली होती.
त्यावेळी डॅनियल्स २७ वर्षांची होते आणि ट्रम्प ६० वर्षांचे होते, या भेटीच्या सुमारे चार महिने आधी ट्रम्प यांची तिसरी पत्नी मेलानिया यांनी मुलगा बॅरॉनला जन्म दिला होता.
डॅनियल्स तिच्या पुस्तकात म्हणते की या दरम्यान ती विचार करत होती की "कदाचित हा मी आतापर्यंत केलेला सर्वात कमी प्रभावी सेक्स असू शकतो." मी ते स्वीकारले आहे.
जानेवारी 2016 मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलने ट्रम्प यांच्याकडून स्टार डॅनियल्सला पैसे दिल्याचा खुलासा केला होता. मॅनहॅटनच्या ग्रँड ज्युरीने याच प्रकरणात ट्रम्प यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.