
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, अमेरिकेत प्रथमच माजी राष्ट्राध्यक्षांवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप
Donald Trump Money Hash Case: पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्यावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला दिलेल्या पैशाची चौकशी केल्यानंतर ज्युरीने आरोपी घोषित केले आहे.
अमेरिकेच्या इतिहासात ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप झाले आहेत आणि त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे. ट्रम्प यांना अटक झाल्यास अटक होणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील.
हे संपूर्ण प्रकरण 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलला एक लाख तीस हजार डॉलर्स देण्याच्या चौकशीशी संबंधित आहे. ज्यामध्ये ट्रम्प यांना आरोपी मानले गेले आहे. (Trump Indicted Over Hush Money, 1st US President To Face Criminal Charges)
ग्रँड ज्युरी तपासात असे आढळून आले की, 2016 मध्ये पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलने मीडियासमोर खुलासा केला होता की तिचे 2006 मध्ये ट्रम्पसोबत संबंध होते. हे समजल्यानंतर, ट्रम्प टीमच्या वकिलाने स्टॉर्मीला शांत राहण्यासाठी 1,30,000 डॉलर दिले.
या प्रकरणात, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्यावरील आरोपांना राजकीय छळ आणि निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचे म्हटले आहे. त्याचा परिणाम विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यावर होईल, असे ट्रम्प म्हणाले.
एका ज्युरीने ट्रम्प यांच्यावर एका पॉर्न स्टारला गुपचूप पैसे दिल्याचा आरोप लावला. न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले आहे की येत्या काही दिवसांत आरोपपत्र जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी 2019 मध्ये ग्रँड ज्युरीसमोर साक्ष दिली आहे. त्यांनी सांगितले की ट्रम्पच्या वतीने डॅनियल्सला पैसे दिले गेले होते, जे नंतर निवडणूक प्रचार खर्चात दाखवले गेले.
त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांची आणखी तीन आरोपांखाली चौकशी सुरू आहे. पैसे देण्याबाबत त्यांची पहिली चौकशी असून, त्यावर निर्णय होणार आहे.
ट्रम्प यांच्यावर 2020 च्या यूएस निवडणुकीशी संबंधित जॉर्जियामध्ये आणि 6 जानेवारी 2021 रोजी वॉशिंग्टनमध्ये कॅपिटलमध्ये त्यांच्या समर्थकांवर हल्ले केल्याचा आरोप आहे. याबाबत ट्रम्प यांची चौकशी सुरू आहे.