esakal | लाइव्ह कार्यक्रमात महिलेने खासदाराला लगावली श्रीमुखात; पाहा Video
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan

नेहमी वादात राहणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळच्या नेत्या डॉक्टर फिरदौस आशिक अवान यांनी एका टीव्ही शोदरम्यान पाकिस्तानी खासदाराच्या श्रीमुखात लगावली आहे.

Video: लाइव्ह कार्यक्रमात महिलेने खासदाराला लगावली श्रीमुखात

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- नेहमी वादात राहणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळच्या नेत्या डॉक्टर फिरदौस आशिक अवान यांनी एका टीव्ही शोदरम्यान पाकिस्तानी खासदाराच्या श्रीमुखात लगावली आहे. सांगितलं जातंय की, पीडित खासदार बिलावल भुट्टो यांची पार्टी पीपीपीचे कादिर मंडोखेल होते. टीव्ही शोच्या रिकॉर्डिंगदरम्यान फिरदौस आशिक अवान इतक्या भडकल्या होत्या की त्यांनी खासदाराला चापट मारली. (Dr Firdous Ashiq Awan slaps PPP MNA Qadir Mandokhel during a TV show recording)

फिरदौस आशिक अवान याआधी पीएम इम्रान खान यांच्या विशेष सहाय्यक होत्या आणि त्या सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्याचे विशेष सहाय्यक आहेत. चापट मारल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये इम्नान खान यांची पार्टी पीटीआयच्या नेत्या फिरदौस आशिक अवान शिव्या देताना दिसत आहेत. ही घटना पत्रकार जावेद चौधरी यांच्या एक्सप्रेस टीव्हीवर एका शोच्या रिकॉर्डिगदरम्यान झाल्याचं सांगण्यात येतंय.

हेही वाचा: 'नियमांचे महत्त्व पटले'; केंद्राच्या दणक्यानंतर ट्विटरही नमले

'आत्मसंरक्षणासाठी मारली चापट'

चर्चा सुरु झाल्यानंतर फिरसौस आशिक अवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पीपीपी खासदार कादिर मंडोखेल यांनी त्यांच्या आई-वडिलांना शिव्या आणि धमकी दिली. फिरदौस म्हणाल्या की, आत्मरक्षणासाठी मी पीपीपी खासदाराला चापट मारली. कादिर मंडोखेल यांनी त्यांना असं करण्यास भाग पाडलं. त्यांनी सांगितलं की, त्या कादिर मंडोखेल यांच्याविरोधात मानसिक त्रास दिल्याची तक्रार दाखल करणार आहेत.

हेही वाचा: प्राण्यांकडून माणसांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

फिरदोस म्हणाल्या की, या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ जाहीर केला जावा. जेणेकरुन लोकांना कळावं की मला असं करण्यास भाग पाडण्यात आलं. माझा अभिमान आणि प्रतिष्ठा शोदरम्यान पणाला लागली होती. मी या प्रकरणात वकीलाशी चर्चा करत आहे. दरम्यान, डॉक्टर फिरदौस कधीकाळी इम्रान खान यांच्या विशेष सहाय्यक होत्या, पण सरकारी खजिन्याचा दुरुपयोग, राजनैतिक नियुक्ती करणे अशा आरोपांखाली त्यांना हटवण्यात आलं होतं. त्यांच्यावर सरकारी जाहीरातीमधील 10 टक्के कमीशन घेतल्याचाही आरोप करण्यात आला होता.