esakal | प्राण्यांकडून माणसांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?
sakal

बोलून बातमी शोधा

lion

चेन्नईच्या प्राणीसंग्राहलयातील एका नऊ वर्षाच्या सिंहाचा कोरोनाची लागण झाल्याचे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

प्राण्यांकडून माणसांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- चेन्नईच्या प्राणीसंग्राहलयातील एका नऊ वर्षाच्या सिंहाचा कोरोनाची लागण झाल्याचे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. कारण, कोरोनाची बाधा झाल्याने एखाद्या प्राण्याचा मृ्त्यू झाल्याचे नोंद झालेले हे पहिलेच प्रकरण होते. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं असून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्राहलयातील इतर प्राण्यांची कोरोना टेस्ट घेण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यांमुळे प्रश्न उपस्थित होतो की, प्राण्यांपासून माणसांना कोरोना होऊ शकतो का?

SARS-CoV-2 विषाणूमुळे कोरोना होतो. कोरोनाचे पहिली केस डिसेंबर 2019 मध्ये आढळून आली होती. 9 जून पर्यंत या विषाणूने आतापर्यंत जवळपास 18 कोटी लोकांना बाधित केलं आहे. या विषाणूचा प्रसार वटवाघुळपासून झाल्याचा दावा केला जातो, पण SARS-CoV-2 चा उगम कोठून झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. अभ्यासात दावा केला जातो की, विषाणू श्वसन थेंबातून पसरतो. पण, विषाणूचा माणसांकडून प्राण्यांकडे प्रचार होत असल्याचे उदाहरणे समोर आले आहेत. मिंक्स, कुत्रा, मांजर, सिंह, वाघ हे प्राणी माणसांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: मुलांसाठी गाईडलाईन्स जाहीर; रेमडेसिव्हिर न वापरण्याचा सल्ला

कोरोना विषाणूचा प्रसार वटवाघुळांकडून माणसांमध्ये झाला असं सांगितलं जातं. असं असलं तरी, Sars-CoV-2 विषाणूचा प्रसार करण्यामध्ये प्राणी महत्त्वाची भूमिका बजावत नसल्याचं पुरावे सांगतात. प्राण्यांकडून विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता खूप कमी आहे. असे असले तरी मिंक्स आणि ओटर्सकडून माणसांना कोरोना झाल्याची उदाहरणे नेदरलँड, डेन्मार्क आणि पोलंडमध्ये समोर आले आहेत. अमेरिकमध्येही अशी उदाहरणे समोर आली आहेत. शक्यतेनुसार, सर्वातआधी माणसांकडून मिंक्समध्ये कोरोनाचा प्रसार झाला.

हेही वाचा: चक्रीवादळांचा अंदाज लवकर समजणार

अभ्यासानुसार कुत्रा, मांजर, डुक्कर, गोरिला, मिंक्स आणि इतर काही प्राण्यांना SARS-CoV-2 विषाणूची लागण होऊ शकते. पण, सर्वच प्राण्यांना या विषाणूची लागण होते का हे स्पष्ट नाही. जे प्राणी माणसांच्या संपर्कात आलेत, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्यांनी प्राणी पाळले आहेत, त्यांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अशा प्राण्यांना गर्दीत नेणे टाळा, किंवा अनोळखी प्राण्यांना जवळ करु नका.

loading image