इराक पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन हल्ला

इराक पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन हल्ला
Summary

इराकी लष्कराने हा हल्ला पंतप्रधानांची हत्या करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. अल अरबियाने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत.

इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांच्या निवासस्थानी स्फोटक असलेल्या ड्रोनने हल्ला झाला आहे. हा हल्ला रविवारी सकाळी झाला. यातून इराकचे पंतप्रधान थोडक्यात वाचले आहेत. इराकी लष्कराने हा हल्ला पंतप्रधानांची हत्या करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. अल अरबियाने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत.

इराकी लष्कराने या हल्ल्याबाबत म्हटलं की, कदीमी यांच्या बगदादमधील निवासस्थानी हल्ला झाला. ग्रीन झोनला टार्गेट करण्यात आलं होतं. अद्याप याबाबत अधिक माहिती लष्कराने दिलेली नाही.

इराकच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कदीमी यांच्या निवासस्थानी ड्रोनने हल्ला झाला. सुदैवाने यात पंतप्रधान कदीमी यांना कोणतीही इजा झालेली नाही. हल्ल्यानंतर कदीमी यांनी ट्विट करून आपण सुखरुप असल्याचं सांगितलं. तसंच लोकांनी शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी केलं.

इराक पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन हल्ला
‘त्या’ जनुकामुळे द. आशियाला कोरोना संसर्गाचा धोका

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही. पंतप्रधान निवासस्थानाच्या परिसरात ग्रीन झोनमध्ये सरकारी इमारती आणि परदेशी दूतावास आहेत. पाश्चिमात्य देशांच्या राजदूतांनी सांगितले की, त्यांनी स्फोटाचे आणि गोळीबाराचे आवाज ऐकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com