सौदीच्या तेलकंपनीवर ड्रोन हल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

सौदी अरेबियातील तेल कंपनी 'अरामको'च्या दोन फॅसिलिटी सेंटर्समध्ये आग लागल्याची घटना घडली. या सेंटरला लागलेली ही आग ड्रोन हल्ल्यामुळे लागली असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिली.

इस्तांबुल : सौदी अरेबियातील तेल कंपनी 'अरामको'च्या दोन फॅसिलिटी सेंटर्समध्ये आग लागल्याची घटना घडली. या सेंटरला लागलेली ही आग ड्रोन हल्ल्यामुळे लागली असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिली.

'खुराइस' आणि 'अबकॅक' येथील फॅसिलिटी सेंटर्सवर हे ड्रोन हल्ले झाले. या परिसरात पहाटे 4 वाजता गोळीबार सुरु झाला होता. या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. तेल कंपनीवरील ड्रोन हल्ल्यानंतर दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू केला जात आहे, अशी माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली. 

आता ‘वन नेशन वन लँग्वेज’; अमित शहा यांचे ट्विट

दरम्यान, मागील महिन्यातही अरामकोच्या नॅचरल गॅस फॅसिलिटीवरही अशाचप्रकारे हल्ला करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये मोठे नुकसान झाले नाही. त्यानंतर आता हा हल्ला झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drone Strikes Spark Fires at Saudi Oil Facilities