esakal | VIDEO: जगातील सर्वांत खोल स्विमिंग पूल; Sci-fi चित्रपटापेक्षा कमी नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Deep Dive Dubai

जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल दुबईमध्ये सुरु झाले आहे. या स्विमिंग पूलची खोली तब्बल 196 फूट (60 मीटर) आहे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबईमध्ये या अद्भूत 'न्यू डिप डाईव्ह' (Deep Dive Dubai) ची निर्मिती करण्यात आली आहे.

जगातील सर्वांत खोल स्विमिंग पूल; VIDEO पाहून म्हणाल 'अद्भूत'

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

Deep Dive Dubai दुबई- जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल दुबईमध्ये सुरु झाले आहे. या स्विमिंग पूलची खोली तब्बल 196 फूट (60 मीटर) आहे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबईमध्ये या अद्भूत 'न्यू डिप डाईव्ह' (Deep Dive Dubai) ची निर्मिती करण्यात आली आहे. दुबईमध्ये जगातील सर्वात मोठी बिल्डिंग आणि सर्वात मोठे मॉल आहे. त्यात आता सर्वात मोठ्या आणि खोल स्विमिंग पूलची भर पडली आहे. पूलमध्ये असामान्य अशा सुविधा असल्याचं वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे.

दुबईतील या स्विमिंग पूलची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून याचा उल्लेख पोहोचण्यासाठी सर्वात खोल स्विमिंग पूल असा केला आहे. पूलचा प्लोअर एरिया 5,000m2 आहे. शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम (Sheikh Hamdan bin Mohammed bin Rashid al Maktoum) यांनी पूलची निर्मिती केली आहे. त्यांनी या स्विमिंग पूलच्या व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. एक वेगळ्या जगाचा प्रवास करा, असं ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: हाफिजच्या घराबाहेरील स्फोटामागे भारत? परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर

व्हिडिओमधील स्विमिंग पूलमध्ये एखाद्ये आधुनिक शहर पाण्यात बुडाल्यासारखं वाटतं. यात सर्व प्रकारची सुविधा आहे. बाथरुम, झाड, लायब्ररी आणि गेम अशा अनेक गोष्टी पूलमध्ये आहेत. स्विमिंग पूल तब्बल 60 मीटर खोल आहे. एक वेगळं जग पाण्यात सुरु करण्यात आलं आहे. माहितीनुसार, स्विमिंग पूलमध्ये 1.4 कोटी लिटर पाणी आहे. सहा ऑलिम्पिक स्विमिंग पूल बसतील इतका याचा आकार आहे. पाण्याचे तापमान 30 डिग्री ठेवण्यात आलं आहे.

एखाद्या प्राचिन, पण पाण्यात बुडालेल्या शहराचा अनुभव हे स्विमिंग पूल देत आहे. जगात अनेक मोठे स्विमिंग पूल आहेत, पण या स्विमिंग पूलशी स्पर्धा करु शकेल असं कोणतंही नाही. हे केवळ स्विमिंग पूल नाही, तर पाण्यातील आयुष्याचा अनुभव देणारी एक भन्नाट जागा आहे. पूल सध्या काही निमंत्रित लोकांसाठीच सुरु आहे. पण, पुढील वर्षापासून हे सर्वांसाठी सुरु करण्यात येणार आहे. जगभरातील लोक या स्विमिंग पूलला भेट देतील, अशी अद्भूत रचना या स्विमिंग पूलची करण्यात आली आहे.

loading image