esakal | हाफिज सईदच्या घराबाहेरील बॉम्बस्फोटामागे भारत? परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Hafiz-Saeed

चार दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केला होता. 23 जून रोजी जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या घराजवळ बॉम्बस्फोट केल्यामागे भारताचा हात असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.

हाफिजच्या घराबाहेरील स्फोटामागे भारत? परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

इस्लामाबाद bomb blast outside hafiz saeeds house- चार दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केला होता. 23 जून रोजी जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या घराजवळ बॉम्बस्फोट केल्यामागे भारताचा हात असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यावर भारत सरकारने उत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पाकिस्तानचा आरोप निराधारा असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान या माध्यमातून खोटा प्रचार करु पाहात असल्याचं भारताने म्हटलं आहे. (bomb blast outside hafiz saeeds house india said accusation baseless propaganda)

पाकिस्तानचा दहशतवादाबाबत काय इतिहास आहे, हे आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती आहे. भारताविरोधात खोटा प्रचार करणे हे पाकिस्तानसाठी नवे नाही. पाकिस्ताने स्वत:ची जमीन दहशतवाद्यांना वापरु दिली आहे. येथूनच हे दहशतवादी भारताविरोधात कारवाई करत असतात. पाकिस्तानच्या नेतृत्वाने कायमच दहशतवादाचा पुरस्कार केला आहे. ओसामा बिन लादेन सारख्या दहशतवाद्याला या देशाने शहीद ठरवलं आहे, असं म्हणत प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी पलटवार केला आहे. असे असले तरी भारताने प्रत्युत्तर देण्यासाठी चार दिवसांचा वेळ लावला. सहजा भारत लगेचच पाकिस्तानला उत्तर देत असतो.

हेही वाचा: Corona Update: देशात गेल्या 24 तासांत 44 हजार 459 कोरोनामुक्त

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद (Hafiz Saeed) आहे. त्याच्या लाहोरमधील (lahore blast) घराजवळ 23 जूनला कार बॉम्बस्फोट (car bomb) झाला होता. हा बॉम्बस्फोट रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग म्हणजेच RAW ने घडवून आणल्याचा आरोप पाकिस्तानने (Pakistan) केला. लाहोरमधल्या स्फोटाचे टेलिफोन रेकॉर्डसह आर्थिक व्यवहाराचे असे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. हे सर्व पुरावे भारतातून हा हल्ला प्रायोजित करण्यात आल्याचे संकेत देत आहेत" असे डॉ. मोईद युसूफ म्हणाले होते.

हेही वाचा: 'डेल्टा'पासून संरक्षणासाठी तिसरा डोस; Pfizer ला हवी परवानगी

लाहोरमध्ये हाफिजच्या घराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार झाले होते, तर २४ जण जखमी झाले होते. दरम्यान, RAW ही भारताची बाह्य गुप्तचर संघटना आहे. परदेशात भारताविरोधात रचल्या जाणाऱ्या कारस्थानांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी 'रॉ' वर आहे. परदेशात शत्रूंविरोधात RAW ने अनेक ऑपरेशन राबवल्याचं सांगितलं जातं. तसेच भारताविरोधातील अनेक कट उधळून लावले आहेत.

loading image