esakal | चीनची कोविड-19 लस यूएईच्या पंतप्रधानांनी घेतली टोचून
sakal

बोलून बातमी शोधा

uae

अनेक देशांमध्ये कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे

चीनची कोविड-19 लस यूएईच्या पंतप्रधानांनी घेतली टोचून

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

दुबई- जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. काही लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. अशात युनायटेड अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधानांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे यूएईमधील आणखी एका एका महत्वाच्या व्यक्तीला लस देण्यात आली आहे. 

शेख मोहम्मद बिन रशिद अल मख्तुम हे दुबईचे शासक आहे. त्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. शेख मोहम्मद यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. ते ट्विटमध्ये म्हणालेत की, ''आज कोविड-19 चा डोस घेताना मी सर्वांची सुरक्षा आणि आरोग्य इच्छितो. ज्यांनी यूएईमध्ये कोरोना लस निर्माण करण्यासाठी दिवसरात्र काम केले, त्यांचे मी आभार मानतो.'' यूएईचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन सयद यांनी मागील आठवड्य़ात कोविड-19 लस घेतली होती. 

US Election - ट्रम्प यांचा अमेरिकेतील 'युपी'मध्ये विजय; बायडेन यांची...

यूएईमध्ये चीन कोरोना लशीची चाचणी घेत आहे. चीनची सिनोफार्म ग्रुप कंपनी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेत असून हजारो स्वयंसेवकांना लशीचा डोस देण्यात आला आहे. कंपनीने जून महिन्यात लशीचे परिक्षण सुरु केले होते. त्यानंतर सप्टेंबरपासून या लशीच्या आपातकालीन उपयोगाला परवानगी देण्यात आली आहे. 

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सध्या 150 पेक्षा अधिक कंपन्या कोरोनावरील प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत. त्यातील 10 पेक्षा अधिक कोरोना लशी मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहे. डिसेंबरपर्यंत किंवा 2021 च्या सुरुवातीच्या काही महिन्यात प्रभावी कोरोना लस मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.