भारतीय प्रवाशांसाठी दुबईचा महत्वाचा निर्णय; पूर्व RT-PCR कोविड चाचणी रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UAE emirates
भारतीय प्रवाशांसाठी दुबईचा महत्वाचा निर्णय; पूर्व RT-PCR कोविड चाचणी रद्द

भारतीय प्रवाशांसाठी दुबईचा महत्वाचा निर्णय; पूर्व RT-PCR कोविड चाचणी रद्द

नवी दिल्ली : ज्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत अशा प्रवाशांना भारताततून (Dubai) दुबईला जाणासाठी आता कोविड आरटीपीसीआर चाचणीची (RTPCR Test) गरज नाही. यापूर्वी दुबईला जाण्यासाठी सहा तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणीचं प्रमाणपत्र बंधनकारक होतं. खलीज टाईम्सच्या (Khalij Times) वृत्तानुसार दुबई एअरपोर्टनं नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. (Dubai scraps pre departure RT PCR Covid test for Indian travellers)

हेही वाचा: ''संपात सहभागी झाल्यास...'' राज्य सरकारने दिला कर्मचाऱ्यांना इशारा

दुबई एअरपोर्ट्सच्या नव्या नियमावलीनुसार, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशातून दुबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असलेल्या आरटीपीसीआर चाचणीची अट रद्द करण्यात आली आहे. हा नवा नियम २२ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

हेही वाचा: 'हिजाब' धर्म स्वातंत्र्याच्या हक्कात मोडत नाही; कर्नाटक सरकारची हायकोर्टात माहिती

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दुबई एअरपोर्टच्या परिपत्रकानुसार, या देशांमधील प्रवाशांना प्रवासाच्या 48 तासांच्या आत घेतलेल्या RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. दुबईत आल्यावर त्यांची पीसीआर चाचणीही करावी लागेल. याचा निकाल येईपर्यंत प्रवाशांना स्वत:ला क्वारंटाइन ठेवणं आवश्यक आहे. मात्र, या परिपत्रकात RT-PCR चाचणी आवश्यक असल्याचा उल्लेख केलेला नाही.

Web Title: Dubai Scraps Pre Departure Rt Pcr Covid Test For Indian Travellers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..