esakal | इंटरनेटला मर्यादा असल्याने मेक्सिकोत टीव्हीवर शाळा
sakal

बोलून बातमी शोधा

school

मेक्सिकोत शाळा सुरू करण्यासाठी दूरचित्रवाणीची मदत घेतली जात आहे.टीव्ही देशातील 94 टक्के भागांत आहे. हेच इंटरनेटची व्याप्ती आणि उपलब्धता70ते 80टक्के इतकीच आहे. त्यामुळे टीव्हीला प्राधान्य देण्यात आले.

इंटरनेटला मर्यादा असल्याने मेक्सिकोत टीव्हीवर शाळा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेक्सिको सिटी - मेक्सिकोत शाळा सुरू करण्यासाठी दूरचित्रवाणीची मदत घेतली जात आहे. याच माध्यमातून नवे शालेय वर्ष सोमवारपासून सुरू झाले. टीव्ही देशातील 94 टक्के भागांत आहे. हेच इंटरनेटची व्याप्ती आणि उपलब्धता 70 ते 80 टक्के इतकीच आहे. त्यामुळे टीव्हीला प्राधान्य देण्यात आले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय पातळीवर दूरस्थ शिक्षणाचा उपक्रम सुरू झाला असून यात सुमारे तीन कोटी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यानंतरही टीव्हीवरील शिक्षणाचा दर्जा किती चांगला असेल याविषयी अनेक पालकांनी शंका व्यक्त केली आहे. चार खासगी दूरचित्रवाणी केंद्रांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येईल. मेक्सिकोत कोरोनामुळे आतापर्यंत 60 हजारहून जास्त बळी गेले आहेत.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप