esakal | तालिबानच्या क्रूर राजवटीत पत्रकारावर आली मजुरीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban

तालिबानच्या क्रूर राजवटीत पत्रकारावर आली मजुरीची वेळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काबूल : तालिबानच्या राजवटीनंतर अफगाणिस्तानातील पत्रकार आणि माध्यम कर्मचाऱ्यांनी स्थिती बिकट बनली आहे. काही पत्रकारांनी देश सोडला आहे तर काही जण अन्य व्यवसाय, नोकरी करत आहेत. बादगिस प्रांतातील पश्‍चिम फिरोज कोह शहरात माध्यमांसाठी काम करणारे जबिउल्लाह वफा हे आता वीटभट्टीवर काम करत आहेत. दहा जणांचे कुटुंब सांभाळण्यासाठी वफा हे विटा तयार करण्याचे काम करत आहे.

हेही वाचा: राईस कुकरसोबत लग्न करणाऱ्या तरुणाचा ४ दिवसात घटस्फोट, सांगितलं 'हे' कारण

जबिउल्लाह वफा हे दहा वर्षांपासून बादगिस प्रांतात एक पत्रकार म्हणून काम करत होते. परंतु स्थानिक माध्यमांनी आर्थिक कारणावरून त्यांना नोकरीवरून काढून टाकले. जबिउल्लाह वफा म्हणाले, की तालिबानने ताबा मिळवल्यानंतर स्थानिक माध्यमांनी मला नोकरीवरून काढून टाकले. आपण दोन महिन्यांपासून बेरोजगार होतो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपण वडिलांबरोबर वीट तयार करण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. वफा यांनी म्हटले की, अफगाणिस्तानातील शेकडो पत्रकार बिकट स्थितीचा सामना करत आहे.

हेही वाचा: #MahaConclave: सहकाराच्या वृद्धीसाठी ही महापरिषद उपयोगी ठरो: गडकरी

तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतर अफगाणिस्तान वर्तमानपत्र चालवणे कठीण होऊ लागल्याने सुमारे दीडशेहून अधिक माध्यमांची कार्यालय बंद पडले आहेत. एका पत्रकाराने म्हटले की, माध्यम ही जाहिरातीवर अवलंबून असतात. परंतु आता अफगाणिस्तानात कोणतीही जाहिराती प्रसारित केल्या जात नाही. तालिबानने नियुक्त केलेले माहिती आणि संस्कृती उपमंत्री जबिउल्लाह मुजाहिद याने देशांत माध्यमावर कोणत्याही प्रकारचा निर्बंध नसल्याचे म्हटले आहे.

loading image
go to top