esakal | #MahaConclave: सहकाराच्या वृद्धीसाठी ही महापरिषद उपयोगी ठरो: गडकरी
sakal

बोलून बातमी शोधा

#MahaConclave: सहकाराच्या वृद्धीसाठी ही महापरिषद उपयोगी ठरो: गडकरी

#MahaConclave: सहकाराच्या वृद्धीसाठी ही महापरिषद उपयोगी ठरो: गडकरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: देशात सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यापासून या विषयावर उलट-सुलट अशा अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र याबाबत पहिल्यांदाच सहकार क्षेत्राबद्दल एक महापरिषद पार पडत आहे. 'सकाळ' समूहाच्या पुढाकाराने पार पडणाऱ्या या परिषदेला सहकार बँकिंग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली.

हेही वाचा: #MahaConclave: "गरीबांमध्ये थेट लाभाचे वितरण होण्यासाठी प्रयत्नशील" - अर्थराज्यमंत्री

सहकार क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवर चर्चा यावेळी झाली. आपल्या मनोगतात गडकरींनी अनेक उदाहरणे आणि किस्स्यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील त्रुटी, सुधारणांची गरज आणि पुढील वाटचालींसदर्भात आपली मते व्यक्त केली. त्यांनी जुन्या घटनांचे संदर्भ देत सहकार क्षेत्राच्या वाटचालीला उजाळा देखील दिला. या विषयावर अशी महापरिषद आयोजित केल्याबद्दल सकाळ समूहाचे त्यांनी अभिनंदन देखील केली. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे चेअरमन प्रतापराव पवार, सकाळचे समूह संपादक श्रीराम पवार उपस्थित होते.

नितीन गडकरी यांनी म्हटलंय की, सहकार हा विषय राज्याच्या आणि केंद्राच्या अशा दोन्ही यादीत येत असल्याने बरेच गोंधळ आहेत. ज्या पक्षाचं सरकार आहे, ते आपपल्या दृष्टीने या विषयाकडे पाहतात. तर दुसरीकडे सत्तेत असणारे आणि विरोधात असणाऱ्यांचा आपापला दृष्टीकोन असतो. सध्या या क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्राने निर्णय घेतलाय.

यावर तुम्ही मोठी महापरिषद घेताय ही कौतुकास्पद बाब आहे. या महापरिषदेतून सहकार चळवळ समृद्ध व्हावी, कृषी आणि ग्रामीण क्षेत्राची याद्वारे भरभराट व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे. या चिंतनातून जे मंथन होईल ते नक्कीच लाभदायक ठरेल, अशी मी आशा व्यक्त करतो, असं त्यांनी म्हटलंय.

loading image
go to top