
स्वातंत्र्यावर गदा आणू नका; नुपूर शर्मांना पाठिंबा देणारे डच खासदार म्हणतात...
नवी दिल्ली : नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जगभरातील इस्लामी राष्ट्रांनी भारताला धारेवर धरले आहे. दरम्यान आखाती देशांनी भारताने माफी मागण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर भारताने प्रवक्ते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान डच खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे.
(Dutch MP Geert Wilders On Nupur Sharma)
देशाच्या आर्थिक फायद्यासाठी कुणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जावू नये असं मत डच खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी व्यक्त केले आहे. सत्य बोलल्याप्रकरणी कुणालाही शिक्षा करण्यात येऊ नये असं ते म्हणाले आहेत.
हेही वाचा: 'भाजपने अडगळीत टाकलं आणि पवारांनी हात दिला'; खडसेंनी मानले आभार
"भारत आणि नेदरलँड्स सारख्या लोकशाही देशामध्ये कायदे आहेत. अशा देशात कोण गुन्हेगार आहे हे न्यायालये ठरवत असतात. भाषण स्वातंत्र्य हे लोकशाहीतील सर्वात महत्वाच्या मूल्यांपैकी एक आहे. नुपूर शर्माने जे बोलले ते तुम्हाला आवडू शकते किंवा आवडू शकत नाही पण तिला बोलण्याचा अधिकार आहे." असं डच खासदाराने सांगितलं.
एका टीव्ही शोमधील चर्चा सत्रामध्ये पैगंबराबाबत आक्षेपार्ह वक्तव्यमुळे त्यांच्यावर टीका केली जात होती. दरम्यान गीर्ट वाइल्डर्स यांनाही नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्याप्रकरणी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं आहे.
"जेव्हापासून मी नुपूर शर्मा यांचं समर्थन करू लागलो आहे तेव्हापासून मला मारण्याच्या धमक्या येत आहेत. मी कुराणावर चित्रपट बनवल्यामुळे मला फतवे आले आहेत. तेव्हापासून मी माझे घर सोडले आहे. या परिस्थितीचा सामना नुपूर शर्मा यांना कसा करावा लागत असेल ते मला माहिती आहे. ती जे काही बोलली आहे ते चूक नाही म्हणून मी तिला पाठिंबा देत आहे." असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा: Prophet Muhammad Row: भारताच्या भूमिकेवर इराणचे परराष्ट्रमंत्री समाधानी
"मी कुराणावर चित्रपट बनवला होता, त्यामध्ये इस्लामिक विचारसरणीवर टीका केली होती. त्यामुळे मला अल-कायदा आणि तालिबालकडून फतवे आले होते. तेव्हापासून मी माझे घर सोडून सरकारने दिलेल्या निवासस्थानावर राहत आहे. इस्लामवर टीका केल्याप्रकरणी मला १७ वर्षापासून पोलिसांच्या तपशीलाशिवाय रस्त्यावर फिरण्याची संधी मिळाली नाही. १७ वर्षापासून मी माझे वैयक्तिक स्वातंत्र्य गमावले आहे." असं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
Web Title: Dutch Mp Geert Wilders On Nupur Sharma Muhammad Paigambar Row
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..