esakal | बलुचिस्तानला भूकंपाचा धक्काI Earthquake
sakal

बोलून बातमी शोधा

बलुचिस्तानला भूकंपाचा धक्का

बलुचिस्तानला भूकंपाचा धक्का

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कराची : बलुचिस्तानातील हरनईसह सहा जिल्ह्यांत आज पहाटे ३.२० च्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यात २२ जण मृत्युमुखी पडले असून ३०० हून अधिक जखमी झाले. या भूकंपामुळे शेकडो घरांची पडझड झाली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर ५.९ इतकी नोंदली गेली. आज पहाटे नागरिक गाढ झोपेत असताना अचानक जमीन हादरल्याने घबराट पसरली. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले.

भूकंपाचा केंद्रबिंदू हा हरनई येथे पंधरा किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाने मालमत्तेची किती हानी झाली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. बलुचिस्तानातील हरनई जिल्ह्याबरोबरच क्वेटा, सिबी, पिशीन, किला सैफुल्लाह, चमन, झियारत, झोओब या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले. भूकंपातील सर्वाधिक मृत आणि जखमी हे हरनई जिल्ह्यातील आहेत.

loading image
go to top