भूकंपाने हादरला चीन; तीव्रताही मोठी

वृत्तसंस्था
Thursday, 23 July 2020

चीनमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बीजिंग : कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटात चीनसह जगभरात अनेक देश आहेत. चीनमध्ये कोरोनाचे संकट थांबत नसतानाच आता चीनमध्ये मोठा भूकंप झाला. या भूकंपामुळे चीनमधील नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

चीनमध्ये संकट काही केल्या कमी होत नाही. यापूर्वी कोरोनाचे संकट देशात आले होते. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि पुराने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यानंतर आता रात्री 1.37 वाजता मोठा भूकंप झाला. दक्षिण तिब्बलच्या जवळच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणत्याही नुकसानाची माहिती अद्याप समजू शकले नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू बीजिंगपासून 380 किमी दूर असलेल्या उत्तर दिशा येथे होता. मोठा भूकंप झाल्याने लोक भयभीत झाले होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केलवर नोंद करण्यात आली आहे. 

सातारा : कोयना परिसरात भूकंप; वारणा ...

आलास्का पर्वत रांगावरही भूकंप

यापूर्वीही अलास्काच्या पर्वत रांगावरही भूकंप झाला होता. यामध्ये 7.8 रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. त्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, हवामानात बदल झाल्याने तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिका भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर रात्री 11.13 मिनिटांनी हा भूंकप झाला. 

इंडोनेशियामध्येही भूकंप

इंडोनेशियामध्ये 7 जुलैला मोठा भूकंप झाला होता. हा भूकंप पश्चिमी मध्य प्रांतातील जावा येथे झाला. इंडोनेशियाच्या भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake in south china an earthquake of mangnitude 6 points 2 says national center for seismology