economy of pakistan the worst safety question report released by the World Bank
economy of pakistan the worst safety question report released by the World Banksakal

पाकची आर्थिक स्थिती बिकट

वाढत्या महागाईचा देशावर अत्यंत विपरित परिणाम

इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमकुवत असून या देशातील ३४ टक्के जनतेचे दैनंदिन उत्पन्न सरासरी ३.२ अमेरिकी डॉलर (५८८ पाकिस्तानी रुपये) इतके कमी असल्याचे जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानच्या आर्थिक विकासाचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. वाढत्या महागाईचा देशावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे.

इंधन आणि अन्नपदार्थांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूच महाग झाल्याने सामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानातील गरीब व्यक्ती त्याच्या उत्पन्नातील ५० टक्के रक्कम ही अन्नावर खर्च करतो. ३४ टक्के जनतेचे सरासरी दैनंदिन उत्पन्न केवळ ५८८ पाकिस्तानी रुपये इतके आहे. यातील निम्मे पैसे पोट भरण्यासाठी खर्च झाल्यावर आणि अधिकांश रक्कम दैनंदिन गरजा भागविण्यावर खर्च झाल्यावर त्यांच्या हातात फार काही शिल्लक रहात नाही.

नवे अर्थमंत्री मिफ्ता इसामिल हे जागतिक बँकेने आयोजित केलेल्या परिषदेसाठी वॉशिंग्टनला जात आहेत. पाकिस्तानची आर्थिक स्थिती त्यांनी मांडण्याऐवजी त्यांनाच जागतिक बँक आणि नाणेनिधीकडून आपल्या देशापुढील आव्हानांची माहिती होईल, असे पाकच्या माध्यमांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com