ब्रिटनमधील संस्थेकडून होणार पाच भारतीय शाळांचा गौरव

ब्रिटनमधील संस्थेकडून होणार गौरव; पुण्या- मुंबईतील शाळांचा समावेश
Five Indian schools honored by UK-based organization London schools in Pune-Mumbai
Five Indian schools honored by UK-based organization London schools in Pune-MumbaiSakal
Updated on

लंडन : जागतिक पातळीवर आता गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय शाळांचा देखील डंका वाजू लागला असून विविध श्रेणींमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या दहा शाळांच्या यादीमध्ये भारतातील पाच शाळा झळकल्या आहेत. समाजाच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या विजेत्या संस्थांना अडीच लाख डॉलरचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. मुंबईतील एसव्हीकेएमच्या छत्रभूज नर्सी मेमोरिअल स्कूल, नवी दिल्लीतील एसडीएमसी प्राथमिक शाळा लाजपत नगर-३ या दोन संस्थांनी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या मूलगामी कामाबद्दल त्यांचा दहा आघाडीच्या संस्थांमध्ये समावेश करण्यात आला असून सामाजिक सहकार्याच्या क्षेत्रामध्ये भरीव काम केल्याबद्दल मुंबईतील खोज स्कूल आणि पुण्याच्या बोपखेल येथील पीसीएमसीच्या इंग्लिश मीडियम स्कूलची निवड करण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या श्रेणीमध्ये हावड्यातील सामारितन मिशन स्कूल (हाय)ची निवड झाली आहे.

अभ्यासक निवडणार विजेते

ब्रिटनमधील डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म टी-४ एज्युकेशनच्या पुढाकाराने जगातील सर्वोत्तम शाळांना गौरविण्यात येणार आहे. सामाजिक सहकार्य, पर्यावरणविषयक कृती, संशोधन, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीला हातभार लावणे यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पाचपैकी तीन शाळांचा गौरव केला जाणार असून आरोग्यदायी जीवनशैलीला पाठिंबा देणाऱ्या संस्थांना पुढील वर्षी गौरविण्यात येईल. पुरस्कार विजेत्या संस्थांची निवडही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासकांकडून करण्यात येईल.

कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद झाल्याने तब्बल १.५ अब्ज विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले होते. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रातील संघर्ष आणखी वाढला. हे संकट येण्याआधी देखील संयुक्त राष्ट्रांनी गुणवत्तापूर्ण शैक्षणिक ध्येय गाठण्यासाठी २०३० च्या दिशेने सुरू असलेली आपली वाटचाल संथगतीने सुरू असल्याचे म्हटले होते. आता शिक्षणक्षेत्रामध्ये मूलगामी बदल घडवून आणण्यासाठी आम्ही या पुरस्कारांची सुरूवात केली आहे.

- विकास पोटा, संस्थापक टी-४ एज्युकेशन आणि वर्ल्ड बेस्ट स्कूल प्रायझेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com