इजिप्त पोलिसांच्या कारवाईत 40 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

गिझा येथे बसवर बॉम्बहल्ला झाला. त्यानंतर गिझा प्रशासनाने इजिप्तियन पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई केली. यामध्ये दोन ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात आली.

कायरो : गिझा येथे एका बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर इजिप्तियन पोलिसांनी 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला. गिझा येथे झालेल्या हल्लात येथील तीन पर्यटकांसह त्यांच्या गाईडचा मृत्यू झाला. त्यानंतर आज (शनिवार) इजिप्तियन पोलिसांनी ही कारवाई केली. 

गिझा येथे बसवर बॉम्बहल्ला झाला. त्यानंतर गिझा प्रशासनाने इजिप्तियन पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई केली. यामध्ये दोन ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात आली. यादरम्यान 30 दहशतवाद्यांचा या ठिकाणी खात्मा करण्यात आला. तर इतर 10 दहशतवाद्यांचा नॉर्थ सिनाय येथे ठार करण्यात आले. 

दरम्यान, येथील अधिकाऱ्यांनी सांगितले, की या दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला घडवण्याची तयारी सुरु होती. यामध्ये त्यांनी राज्यातील महत्वाच्या संस्थांना लक्ष्य करण्याचे ठरवले होते. आर्थिक, पर्यटन, लष्कर, पोलिस आणि ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना त्यांच्याकडून लक्ष्य करण्याचा विचार होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Egypt Police killed 40 Terrorists After Giza Bus Attack