Egyptian Treasure Theft
esakal
Egyptian Treasure Theft : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये (Queensland) हॉलिवूड चित्रपटांची आठवण करून देणारी एक थरारक चोरीची घटना उघडकीस आलीये. शुक्रवारी पहाटे सुमारे ३ वाजता ब्रिस्बेन (Brisbane) शहराच्या उत्तरेला असलेल्या काबुल्चर (Caboolture) येथील अॅबे म्युझियम ऑफ आर्ट अँड आर्कियोलॉजी (Abbey Museum of Art and Archaeology) मध्ये एका अज्ञात चोराने खिडकी फोडून प्रवेश केला. त्याने प्राचीन इजिप्तमधील अत्यंत मौल्यवान आणि दुर्मीळ कलाकृती चोरून नेल्या. मात्र, पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत संशयिताला अटक करत बहुतांश कलाकृती परत मिळवल्या.