EICMA 2019 : आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात इलेक्ट्रिक बाइकचा बोलबाला (व्हिडिओ)

संभाजी पाटील @psambhajisakal
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

इक्मा 2019 (EICMA2019)  या जगातील सर्वात मोठ्या दुचाकी वाहनांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शना त एडवेंचर, स्पोर्ट, टूर, रोड स्टार, अर्बन मोबिलिटी, हेरिटेज अशा असंख्य प्रकाराच्या आकर्षक आणि नव्या लूक मधील बाईक जगभरातील बाईक प्रेमींसाठी आज नवनवीन रूपामध्ये सादर झाल्या.

मिलान (इटली) :  इक्मा 2019 (EICMA2019)  या जगातील सर्वात मोठ्या दुचाकी वाहनांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शना त एडवेंचर, स्पोर्ट, टूर, रोड स्टार, अर्बन मोबिलिटी, हेरिटेज अशा असंख्य प्रकाराच्या आकर्षक आणि नव्या लूक मधील बाईक जगभरातील बाईक प्रेमींसाठी आज नवनवीन रूपामध्ये सादर झाल्या.

ऐतिहासिक आणि जगातील सुंदर शहर म्हणून गणल्या जाणाऱ्या इटलीमधील मिलान या शहरात वाहनाची पंढरी समजले जाणारे दुचाकीचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आजपासून खुले झाले. या प्रदर्शनात सुमारे अडीचशे ते तीनशे विविध ब्रँडच्या मोटर सायकल, स्पोर्ट्स बाईक आदी  सर्व प्रकारच्या दुचाकी बाईकप्रेमींसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी जगभरातून विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. या प्रदर्शनाला गेल्यावर्षी दहा लाख नागरिकांनी भेट दिली होती. यावर्षी 10 नोव्हेंबर पर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.  स्पोर्ट्स बाईकवरती सर्वाधिक भर असणाऱ्या या प्रदर्शनामध्ये भारतात खपणाऱ्या आघाडीच्या ब्रँड पैकी होंडा, रॉयल एनफिल्ड, बीएमडब्ल्यू. अवेंजर, सुझुकी असे सर्व ब्रँड या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. होंडाच्या वतीने आज या प्रदर्शनामध्ये पाच नव्या गाड्या लॉन्च करण्यात आल्या. या स्पोर्ट्स बाईक आणि पाचशे, हजार सीसीच्या वरील बाईक बाईकप्रेमींच्या पसंतीला उतरत आहेत.

 

यावर्षी विविध कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाईकवर भर दिला असून, विविध मॉडेल्स त्यामध्ये या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मोटार सायकल साठी 'सब कुछ' अशाच प्रकारचे स्वरूप या प्रदर्शनाचे आहे. बाइकच्या सुट्ट्या भागांपासून हेल्मेट पर्यंत आणि बाईकप्रेमींच्या शूज पासून विविध पोषाखापर्यंत सर्व प्रकारचे स्टॉल्स या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

जगभरात मंदीचे वातावरण असताना आणि वाहनांचा खप कमी होत असताना या प्रदर्शनात वेगवेगळ्या पद्धतीची मॉडेल्स सादर करून दुचाकी बाजारपेठेला उठाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EICMA 2019 Ducati DesertX Scrambler Concept Unveiled