मॉस्कोत भरधाव कारने आठ जणांना उडविले

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत या कारचालकाने फुटबॉल चाहत्यांना धडक दिली. या घटनेत आठ जण जखमी झाले असून, यामध्ये दोन मेक्सिकन, दोन रशियन आणि युक्रेनमधील नागरिकांचाही समावेश आहे. मॉस्कोतील रेड स्क्वॉय़र परिसरात ही घटना घडली.  

मॉस्को : रशियामध्ये विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातून नागरिक येत आहेत. मात्र, शनिवारी एका कार चालकाने फुटबॉलप्रेमींना भरधाव वेगाने कार चालवत धडक दिल्याने आठ जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत या कारचालकाने फुटबॉल चाहत्यांना धडक दिली. या घटनेत आठ जण जखमी झाले असून, यामध्ये दोन मेक्सिकन, दोन रशियन आणि युक्रेनमधील नागरिकांचाही समावेश आहे. मॉस्कोतील रेड स्क्वॉय़र परिसरात ही घटना घडली.  

आज (रविवार) मेक्सिको आणि जर्मनी यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या कारचालकाला अटक करण्यात आली आहे. कारचालक पळून जाण्याच्या प्रय़त्नात होता, पण नागरिकांनी त्याला पकडले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eight injured in Moscow as taxi strikes pedestrians