श्रीलंकेमध्ये प्रथमच जुळ्या हत्तींचा जन्म

वृत्तसंस्था
Friday, 10 July 2020

तीन ते चार आठवज्यूंपूर्वी जन्माला आलेल्या पिल्लांची छायाचित्रे वन्यजीव संशोधक सुमित पिलापीतीया यांनी प्रसार माध्यमांना दिली. हत्तींच्या कळपावर सातत्याने लक्ष ठेवले असताना हे लक्षात आले. 

कोलंबो - येथील मिन्नेरिया नॅशनल पार्कमध्ये हत्तिणीने जुळ्या पिल्लांना जन्म दिला. श्रीलंकेत नोंद झालेली ही अशी पहिलीच घटना असल्याचे वन्यजीव संवर्धन संचालक थारका प्रसाद यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तीन ते चार आठवज्यूंपूर्वी जन्माला आलेल्या पिल्लांची छायाचित्रे वन्यजीव संशोधक सुमित पिलापीतीया यांनी प्रसार माध्यमांना दिली. हत्तींच्या कळपावर सातत्याने लक्ष ठेवले असताना हे लक्षात आले. हत्तीण आणि जुळ्या पिल्लांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. विविध शोधनिबंधांनुसार हत्तींना जुळे होण्याचे प्रमाण एक टक्याहून कमी असते आणि पिल्ले मोठी होण्याइतपत जगण्याचे प्रमाण आणखी कमी असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elephant gave birth to twins at Minneria National Park in Colombo

Tags
टॉपिकस
Topic Tags: